भारत सरकार तर्फे (केंद्र सरकार )प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM-SYM मध्ये स्वत: व्यवसाय करणारे, मजूर , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तसेच असंघटीत कामगार यांना वृध्प काळत ( वयाच्या ६० वर्ष नंतर ) पेन्शन मिळावी या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे.
PM-SYM प्रधान मंत्री श्रम योगी मानधन या योजनेत सहभागी होण्यासाठी शर्त पुढील प्रमाणे
१. वर्ष १८ ते ४० वर्ष वय असणे गरजेचे आहे.
२. महिना १५००० रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे
३.असंघटीत कामगार - स्वयं -रोजगार असणारी व्यक्ती खाजणी ठिकाणी काम करणारे मजूर, छोटे व्यावसायिक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, न्हावी, सुतार , गवंडी, लोहार, चांभार, शिंपी, हॉटेल चालक , हॉटेल कामगार, सोनार इतर पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर यात सहभागी होऊ शकतात .
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM-SYM या योजनेत पत्र नसणारे पुढील प्रमाणे
१. करदाता (Income Tax) व्यक्ती,
२. संस्थे मधील पगारदर नोकर EPF /NPS/ ESIC सहभागी व्यक्ती.
३. सरकारी नोकरदार
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM-SYM योजनेत सहभाग घेण्यासाठी स्वत ऑनलाईन नोंदणी करता येते https://maandhan.in तसेच जवळच्या आपले सरकार केंद्र, सि एस सी सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र नोंदणी करता येते.
वय नुसार हप्ता हा कमी जास्त राहील जस कि रामच वय १८ वर्ष आहे त्यास ५५ रु दरमहा हप्ता असेल. जर रामचे वय हे २९ असेल तर त्यास १०० रुपये हप्ता असेल त्या प्रमाणात केंद्र सरकार त्यांचा हप्ता जमा करेल.
महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमंतीच्या 50 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख खरेदीसाठी अनुदान दिले जाते
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM - SYM या योजनेत सहभागी होणाऱ्या साठी दरमहा आपल्या वया नुसार हप्ता वयाच्या ६० वर्ष पर्यंत भरावा लागतो, त्या प्रमाणात सरकार सुद्धा हप्ता भरते , उदा. अनिल चे वय ४० आहे त्याचा दरमहा हप्ता २०० असेल तर सरकार २०० जादा रक्कम टाकून अनिल चा हप्ता ४०० जमा होतो असे वयाच्या ६० वर्ष पर्यंत हप्ता भरला तर ६० वर्ष नंतर अनिल ३००० महिना पेन्शन मुर्त्यू पर्यंत सुरु राहील . तसेच वारसा पत्नी सुद्धा त्याचा लाभ होईल . जर अनिल ला योजनेतून बाहेर पडायची असेल तरी त्याने भरलेले हप्ते व व्याज परत मिळते
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM - SYM योजनेत लाभार्थी जर वय ६०नंतर मुर्त्यू झाल्यास जोडीदारास (पती/पत्नी ) यांस अर्धी पेन्शन सुरु होईल
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM - SYM योजनेचे कमी रकमेत जास्त पेन्शन मिळते हियोजना LIC व भारत सरकार रोजगार मंत्रालय यांच्या संयुक्त पणे चालवली जाते.