खरीप २०२३-२०२४ या वर्षातील ई पिक पाहणी करण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी पिक पाहणी स्वत: आपल्या मोबाईलवर ई पिक पाहणी व्हर्जन -२ या ऑप च्या माध्यमातून ई पिक पाहणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो, त्यासाठी कुणाकडे हि जाण्याची गरज नाही. स्वत आपल्या मोबाईल मध्ये शेतात उभा राहून पिक नोंद करू शकतो.
ई पिक पाहणीचे फायदे -
- पिक विमा मिळण्यासा अडचण येत नाही
- पिकाची ७ /१२ वर नोंद होते
- पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासा सोपे जाते
- सरकारी योजनाचा लाभ घेता येतो
- अनुदान मिळण्यासा सुलभ होते
ई पिक पाहणी न केल्यास तोटे-
- पिक विमा मिळण्यासा अडचण होते
- पिकाची नोंद ७/१२ होत नाही
- पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासा अडचण होते
- सरकारी योजना व अनुदान मिळण्यास अडचण होते
पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्तासाठी ई - केवायसी (E -kyc ) करणे गरजेच
ई पिक पाहणी कशी करावी -
मोबाईल मध्ये ई पिक पाहणी व्हर्जन -२ या ऑप घ्यावे. त्यात आपला विभाग निवडावा - जिल्हा निवडावा- तालुका निवडावा- गाव निवडावा - आपला गट नंबर टाकावा - पुढे मोबाईल- व इतर माहिती टाकावी -लॉगीन करून - पिकाची माहिती भरावी - गट नंबर - क्षेत्र - सिंचन सुविधा - पिकाचा प्रकार - पिकाचे नाव - इत्यादि माहिती टाकून- पिकाचा फोटो काढून - सममिट करावे - काही चूक असल्यास दुरूस्ती करून परत सममिट करावे - पुढील ७२ तासात त्यात फेर बदल करू शकता, त्या नंतर बदल करता येत नाही. व आपली पिकाची नोंद केली ७/१२ वर केली जाते
पिक विमा करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा
एक रुपयात पिक विमा- प्रधान मंत्री फसल बिमा योजना (PMFBY) या अंतर्गत योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यासाठी ३१जुलै २०२३ पर्यंत मुदत
पिक विमा करण्यासाठी ई पिक पाहणी गरजेची असून त्या शिवाय पिक विम्याचा लाभ मिळणार नाही.