शेतकरी योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकरी योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ ऑक्टोबर, २०२४

मागेल त्याला सैर कृषी पंप -अर्ज करणे सुरुवात, लगेच करा अर्ज / Solar Krushi Pump Yojana Maharashtra Online Application


मागेल त्याला सैर कृषी पंप / Magel Tyala Saur Krushi Pump Yojana -

योजने चा अर्ज करणे सुरुवात झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज  मागवण्यात येत असून त्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आली आहे . शेतकर्यासाठी हि योजना खूप लाभदायक असून यात जास्त जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा 
Magel Tyala Solar Krushi Pump Yojana Maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्सागत सौर कृषी पंप खरेदी साठी सामान्य  शेतकर्यांसाठी ९०% अनुदान मिळणार आहे.

तसेच अनुसूचित जाती व जमाती (SC and ST )साठी ९५ % अनुदान मिळणार आहे.


वर्गवारी


लाभार्थी हिसा 

अनुसुचित जमाती

 

5%

अनुसुचित जाती

 

5%

सर्वसाधारण


10%

३ एचपी लाभार्थी हिस्सा

रु. 11,486/-*

रु. 11,486/-*

रु. 22,971/-*

५ एचपी लाभार्थी हिस्सा

रु. 16,038/-*

रु. 16,038/-*

रु. 32,075/-*

७.५ एचपी लाभार्थी हिस्सा

रु. 22,465/-*

रु. 22,465/-*

रु. 44,929/

महाराष्ट्र राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत मा. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

मागेल त्याला सैर कृषी पंप -अर्ज करणे  सुरुवात, लगेच करा अर्ज / Solar Krushi Pump Yojana Maharashtra Online Application 

सौर कृषी पंप मुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणार असून शेती साठी विना अडथला मोफत वीज मिळणार आहे. शेतकर्यांना पिकास वेळेत पाणी पुरवठा झाल्या मुळे शेतकर्याचे उत्पन्न वाढ होईल, तसेच उत्पन्न खर्च कमी होईल. 

👉 आवश्यक कागद पत्रे

३. बैंक पासबुक किंवा कॅन्सल चेक
४. जातीचा दाखला (लागू असल्यास - अनुसूचित जाती व जमाती / SC and ST )
५. १०० सौम्यपेपर समाजिक बांधनिपात्र / संमती पत्र सामाईक क्षेत्र 
६. एक फोटो पासपोर्ट साइज

अर्ज हे ऑनलाईन  करायचे असून त्यासाठी महावितरण यांच्या अधिकृत संकेत स्थळावर लिंक  उलपब्ध करून दिली आहे .

मागेल त्याला सैर कृषी पंप अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा  👇👇

 "https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/"

👉  योजनेची ठळक वैशिष्ट्ये-
-शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी स्वतंत्र आणि शाश्वत योजना
-सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनेल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळेल.
-अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% आहे.उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदानित आहे
-जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP क्षमतेचे पंप विम्यासह पाच वर्षांची दुरुस्ती हमी वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा.



मागेल त्याला सैर कृषी पंप अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा  👇👇



👉  लाभार्थी निवड निकष-
-२.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन धारण करणाºया शेतकºयांना ५ एचपी क्षमतेचे आणि कृषी धारक शेतकºयांना ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप पात्र ठरतील. ५ एकरपेक्षा जास्त जमीन. तसेच, शेतकऱ्यांनी पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपांची मागणी केल्यास ते अनुज्ञेय असेल.
-वैयक्तिक किंवा सामुदायिक शेत तलाव, विहिरी, बोअरवेलचे मालक आणि बारमाही नद्या/नाल्यांच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असतील.
-ज्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहीर, नदी इ.मधील पाण्याचे स्त्रोत सुनिश्चित केले आहेत ते महावितरण खात्री करेल. तथापि, जलसंधारणाच्या कामांच्या जलसाठ्यांमधून पाणी काढण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.
-ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही, ते देखील या अभियानांतर्गत लाभासाठी पात्र असतील.



१३ जून, २०२४

१ रुपायात प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ (PMFBY -२०२४ ) मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हि महत्वाची सूचना

 नमस्कार शेतकरी मित्रानो आपण जर  १ रुपायात प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ (PMFBY -२०२४ ) मध्ये सहभागी होणार असाल तर , सहभागी होण्यासाठी पुढील माहितीचे  काळजी पूर्वक पालन करा 

खरीप २०२४   पिक विमा भरताना  यावर्षीनवीन  नियम आला आहे. यात  समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , बँक पासबुक व सातबारा वर नाव  एक सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. किंवा नावात बदल आहे .

उदा. राम - रामराव/ रामनाथ/ रामभाऊ  , बाळासाहेब -- बालासाहेब - बाळू, सुमन - सुमनबाई , जगू - जगन्नथ , जनार्दन - जनार्धन , ज्ञानदेव-  ज्ञानेश्वर- , सुदाम -सुधाकर, सरुबाई-सरस्वती,महादू - महादेव, लैला -लीला . रौफ- रऊफ , कासिम - काशिम , बाबू - बाबुराव / बाबासाहेब, असे अनेक उदाहरण आहेत. ज्या मुळे सातबारा व आधार कार्ड  नावे लिंक होत नाहीत  काही शेतकऱ्यांच्या  साताबरा वरती वडिलाचे व  आडनाव नाहीत किंवा फक्त आडनाव नाव आहे , त्यांनी आपले जसे आधार कार्ड वरती व बँक पासबुक वरती  नाव आहे, तसे नाव दुरुस्थ करावे  घेणे. 

शेतकऱ्यांचे  आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण,  या सर्वांमध्ये जर सारखी  माहिती असेल तरच विम्या चे  फॉर्म अप्रुव्हल होनार नाही आहेत .तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी  काहीही करू शकनार नाहीत.

   कारण अगोदर तुम्हास  विमा येत  होता. ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच बँक  पासबुक वर  विमा जमा होत होता , पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व माहिती  सारखी  असेल तरच विमा जमा होत  आहे ,जर माहिती मध्ये काही चूक असेल  तर तुमचे फॉर्म अप्रुव्हल होनार नाही. त्यामुळे आपणास मोठे नुकसान होऊ शेकते .

तरी शेतकर्यांनी नावात लवकर दुरुस्थी करून घ्यावी. पिक विमा भरावा .


२० जानेवारी, २०२४

पशु आधार विषय माहिती / गाय व म्हैस आधार कार्ड ची अशी नोंदणी करा / How to Make Pashu Aadhar?




  भारतात जगातील सर्वात जास्त पाळीव प्राण्याची संख्या आहे, आणि भारत जगातील सर्वात जास्त दुध उत्पादक देश आहे. भारत सरकारने पाळीव प्राण्याची संख्या  मोजण्यासाठी व प्राण्याची  माहिती साठवण्यासाठी INAPH द्वारे प्राण्यांना टॅगिंग करून विशिष्ट बारा अंकी नंबर दिला जातो, तो नंबर म्हणजे पशु अशार कार्ड (UID) Pashu Aadhar होय.  पशु आधार कार्ड गाय/ म्हैस/ शेळी / व इतर पाळीव प्राणी दिले जाते, त्या मध्ये त्या प्राण्याची (पशु) माहिती डिजिटल digital रुपात साठवली जाते. आता पर्यंत २२ कोटी गाय व म्हैस चा आधार नंबर दिला गेला आहे.

गाय व म्हैस चे आधार कार्ड  हे INAPH (Information Network of Animal Productivity And Health-INAPH)  कडून पशु आधार बनवले जात आहे.

त्यासाठी गाय व म्हैस यांना INAPH हे एक विशिष्ट क्रमांक देत आहे व ते गाय व म्हैस यांना टॅगिंग केले जाते

त्यामुळे प्राणी विकास कार्यक्रमस चालेना मिळेल व गाय / म्हैस  आजार , लसीकरण, कृत्रिम रेतन, पशु खाद्य, प्राण्याची जात, वंशवळ बद्दल माहिती ,पशु पालन साठी विविध योजनाचा प्रसार करता येत, विविध रोगा वरील लसीकरण विषय माहिती साठवली जाते व त्या प्राण्याच्या आरोग्य विषयक माहिती जतन व ऑनलाईन केली जाते, हि माहिती शेतकरी तथा पशु वैदकीय डॉक्टर व सरकारी सर्वेक्षण साठी उपलब्ध करून दिली जाते.

सरकारी विविध योजनेंचा लाभ मिळवणे साठी पशु आधार काढणे व ते शेतकरी आधारला लिंक करणे गरजेचे आहे.

पशु आधार कसे काढावे ? (How to Make Pashu Aadhar?)

पशु आधार हे जवळील सरकारी वैद्यकीय दवखान्यात तयार करून दिले जाते, साठी डॉक्टर ई गोपाल (E-Gopala App )मध्ये नोंदणी करून, गाय व म्हैस यांना टॅगिंग करून त्यावर १२ अंकी नंबर दिला जातो त्यास पशु आधार म्हणून वापरले जाते.

Trousers
Amazon



ई गोपाल (E-Gopala App ) app चा वापर करून शेतकरी आपल्या गाय म्हैस यांची माहिती मिळवता येते, तसेच गायचे लसीकरण कधी झाले, गाईच वय काय?, रंग कोणता?, गाय दुध किती देते, गाईचे किती वीत झाले, तसेचगायीची गर्भ धारणा कधी झाली हि सर्व माहिती यामध्ये जोडता येते, आपल्या माहिती लागल्यास पुन्हा मिळवता येते. यातून त्या गाईची इतिहास (histry) कळते.

शेतकर्यांनी आपल्या गाय साठी पशु आधार काढून घेणे गरजेचे आहे. यातून शेतकर्यांना गाय व म्हैस संगोपन करणे सोपे होईल.

०८ जानेवारी, २०२४

कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी - 2024 जाहीर / Maha-DBT Online Lottery farmer List-2024 of Various Schemes in Agriculture Department

कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी -2024 Maha-DBT Online Lottery farmer List -2024 of Various Schemes in Agriculture Department जाहीर झाली आहे.

०८ सप्टेंबर २०२४  रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  👇👇

Mahadbt-Lottery Farmer List

निवड झालेल्या शेतकर्यांनी आपली ज्या योजने साठी निवड झाली आहे त्या योजनेची कागदपत्रे वेळेत अपलोड करणे गरजेचे आहे. नाहीतर निवड झालेली रद्द होईल, तरी  ज्यांना कागद पत्रे अपलोड करण्यासाठी SMS आले असेल त्यांनी कागदपत्रे पोर्टल वरती उपलोड करून त्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. आपण हे कागदपत्रे महा-डी .बी. टी Maha-DBT   https://mahadbt.maharashtra.gov.in/ )  या  पोर्टल वर अपलोड करावे. कृषी विभागाच्या विविध योजने  जसकि  कांदा चाळ , कृषी औजारे  - रोटा , नांगर  , रेजर , मळणी यंत्र, फवारणी यंत्र , लागवड यंत्र पेरणी यंत्र इ किंवा इतर शेती उपयोगी ट्रक्टर चालीत औजारे व याचं बरोबर शेडनेट , पॅलीहॅउस , मल्चिंग पेपर , शेततळे , शेततळे अस्तरीकरण टिबक सिंचन , तुषार सिंचन , विहीर खोद काम , पंपसेट , पाईप लाईन , डाळ मिल, सोलर ड्रायर , धान्य साठवण ,कृषी औजार बँक  या साठी प्रत्येक योजने साठी वेगळी कागद पत्रे आहेत, तसेच नकाशे , उतारे, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट ,अंदाज पत्र  Estimate इ. माहिती योग्य रित्या भरावी.

 
कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी नाव असणाऱ्या शेतकर्यांनी पुढील कागदपत्रे अपलोड करावे 
१ . ७/१२  उतारा 
२. ८ अ उतारा
३. बँक पासबुक
४. कोटेशेन (Quotation) 
५. टेस्ट रिपोर्ट 
६.आधार कार्ड 
७. डी पी आर ( योजने नुसार)
८. समाहित पत्र ( सामाईक क्षेत्र असेल तर )
९. इतर कागद पत्रे जे योजने नुसार पूर्तता करावी
१० . अपंग दाखला (दिव्यांग प्रमाणपत्र )  UDID  (अपंग असल्यास )
११. जातीचा दाखला (आवशक असल्यास )
१२. उत्पन्न दाखला आवशकअसल्यास )
१३. RC बुक   आवशक असल्यास )



Lottery List of farmer 

०८ सप्टेंबर २०२४  रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  
२४ जुलै  २०२४  रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  

      

१२ जुलै २०२४  रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  

         

०५  जून २०२४  रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  

        *👉०५ /०६/२०२४ यादी 


१८ डिसेंबर २०२३ रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  

        *👉 १८/१२/२०२३ यादी 

२९ डिसेंबर २०२३ रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन शेतकरी सोडत  (Lottery List of farmer)  यादी

        *👉 २९/१२/२०२३ यादी 


ज्या शेतकर्यांनी कागद पत्रे अपलोड केली आहेत . आशा शेतकर्यांना पूर्व संमती आली असेल तर ती वस्तू खरेदी करावी व बिल व संबधित कागद पत्रे उपलोड करावे, ज्यांना पूर्व संमती आली नसेल तर त्यांनी उर्वरित किवां काही त्रुटी आले असेलतर त्यांची पूर्तता करावी, त्रुटी पूर्तता झाल्या नंतर आपणास पूर्व संमती मिळेल. पूर्व समंती आल्या अंतर ज्या कामासाठी पूर्व संमती आली आहे. तीच वस्तू खरेदी करावी  किंवा ज्या योजने साठी पूर्व संमती आली आहे . त्या योजण्याच्या लाभ साठी ज्या आटीशर्ती पूर्ण करून बांधकाम करावे, वस्तू उभी करावी , तसेच त्या सर्वांचे GST बिल आपल्या कडे ठेवावे व ते उपलोड करावे, पूर्व संमती आल्या तारखीपासून १ महिन्याच्या आत मंजुरी ( योजने) नुसार काम पूर्ण करून आपले बिल उपलोड करावे.
कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादीतील शेतकरी यांनी बिल उपलोड करण्यासाठी
  महा डीबीटी MahaDBT वर  farmer Login (शेतकरी वापरकर्ता ) येथे आपले user id व पासवर्ड  टाकून प्रवेश करावे व कागद पत्रे  या सादर आपले बिल रक्कम  व  GST नंबर टाकून बिल उपलोड करावे .

कागदपत्र उपलोड करण्यासाठी पुढील लिंक काचा वापर करावा:-
                                       https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

बिल उपलोड केल्या नंतर मोका तपासणी झाल्या नंतर १ महिन्यात अनुदान शेतकऱ्याच्या खातात जमा होईल .

शेतकर्यांनी विविध योजने साठी अर्ज करण्यासाठी महा डीबीटी पोर्टलचा  https://mahadbt.maharashtra.gov.in/  वापर करावा व महाराष्ट्र शासनाच्या योजनाचा लाभ मिळावा 

१४ नोव्हेंबर, २०२३

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन (MAHABMS) यांच्या सन २०२३-२४ करिता ऑनलाईन अर्ज करा.

 गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप पशुसंवर्धन  विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नाविन्य पूर्ण  योजना व जिल्हास्तरीय  योजना या अंतर्गत सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या संकेतस्थळ  वरती अर्ज मागवण्यात आले आहे. 




पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन  यांची कडून शेळी, गाय , कोबडी वाटप करण्यात येणार असून  नाविन्य पूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ,महिला बचत गट , अल्प भू-धारक शेतकरी,  सुशिक्षित बेरोजगार , दारिद्र्य रेषेखालील  यादीतील लाभार्ती यांना आव्हान करण्यात आले आहे.  सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या  संकेतस्थळ  वरती अर्ज करण्यात येणार असून अर्ज तसेच AH-MAHABMS  हे मोबाईल एप्लीकेशन उपलब्ध असून अचूक माहिती भरून आपला अर्ज पूर्ण करावा . अर्ज प्राधान्य कामाने निवड करण्यात येणार असून दारिद्र्य रेषेखालील,  महिला बचत गट ,अत्यल्प भू-धारक शेतकरी, अल्प भू-धारक शेतकरी, अपंग व्यक्ती ,सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती - जमाती  यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सन २०२१-२२ यावर्षी अर्ज केल्याल्या लाभार्थाची प्रतीक्षा यादी २०२५ -२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. सन २०२२ -२३ मधील अर्जदार लाभार्थी देण्यात येणारा लाभ यादीतील ज्येष्ठता क्रमांक व उपलब्ध निधी नुसार करण्यात येणार आहे 
गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप योजना  अर्ज करण्यासाठी येथे किलिक करा -👇🏼https://ah.mahabms.com/webui/registration

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्रअथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड /कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय -जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजनाचे नाव -

१. राज्यस्तरीय योजना -.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी

देशी गाय – गीरसाहिवालरेड सिंधीराठीथारपारकर देवनीलाल कंधारीगवळाऊ व डांगी.

योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

योजनेचे नाव - 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे


२. जिल्हास्तरीय योजना -

योजनेचे नाव - १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.

योजनेचे नाव - ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

योजनेचे नाव - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

०१ ऑक्टोबर, २०२३

भारत सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ( PM - SYM) योजनेत नोंदणी करा वयाच्या ६० वर्ष नंतर दर महिना ३००० पेन्शन मिळवा



भारत सरकार तर्फे (केंद्र सरकार )प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM-SYM मध्ये स्वत: व्यवसाय करणारे, मजूर , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तसेच असंघटीत कामगार यांना वृध्प काळत ( वयाच्या ६० वर्ष नंतर ) पेन्शन  मिळावी  या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे. 
       
           

PM-SYM प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  या योजनेत सहभागी होण्यासाठी शर्त पुढील प्रमाणे

१. वर्ष १८ ते ४० वर्ष वय असणे गरजेचे आहे. 

२. महिना १५००० रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे 

३.असंघटीत कामगार - स्वयं -रोजगार असणारी व्यक्ती खाजणी ठिकाणी काम करणारे मजूर, छोटे व्यावसायिक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, न्हावी, सुतार , गवंडी, लोहार, चांभार, शिंपी, हॉटेल चालक , हॉटेल कामगार,  सोनार  इतर पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर यात सहभागी होऊ शकतात .

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM-SYM  या योजनेत पत्र नसणारे  पुढील प्रमाणे 

१. करदाता (Income Tax) व्यक्ती,
२. संस्थे मधील पगारदर नोकर EPF /NPS/ ESIC सहभागी व्यक्ती.
३. सरकारी नोकरदार 
 
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM-SYM योजनेत सहभाग घेण्यासाठी स्वत ऑनलाईन नोंदणी  करता येते  https://maandhan.in   तसेच जवळच्या आपले सरकार केंद्र, सि एस सी सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र नोंदणी करता येते.

वय नुसार हप्ता हा कमी जास्त राहील जस कि रामच वय १८ वर्ष आहे त्यास ५५ रु दरमहा हप्ता असेल. जर रामचे वय हे २९ असेल तर त्यास १०० रुपये हप्ता असेल त्या प्रमाणात केंद्र सरकार त्यांचा हप्ता जमा करेल.

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमंतीच्या 50 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख खरेदीसाठी अनुदान दिले जाते


प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM या योजनेत सहभागी होणाऱ्या साठी दरमहा आपल्या वया नुसार हप्ता वयाच्या ६० वर्ष पर्यंत भरावा लागतो, त्या प्रमाणात सरकार सुद्धा हप्ता भरते , उदा. अनिल चे वय ४० आहे त्याचा दरमहा हप्ता २०० असेल तर सरकार २०० जादा रक्कम टाकून अनिल चा हप्ता ४०० जमा होतो असे वयाच्या ६० वर्ष पर्यंत हप्ता भरला तर ६० वर्ष नंतर अनिल ३००० महिना पेन्शन मुर्त्यू पर्यंत सुरु राहील . तसेच वारसा पत्नी  सुद्धा त्याचा लाभ होईल . जर अनिल ला योजनेतून बाहेर पडायची असेल तरी त्याने भरलेले हप्ते व व्याज परत मिळते 

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM योजनेत लाभार्थी जर वय ६०नंतर  मुर्त्यू झाल्यास जोडीदारास (पती/पत्नी ) यांस  अर्धी पेन्शन सुरु होईल

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM योजनेचे कमी रकमेत जास्त पेन्शन मिळते हियोजना LIC व भारत सरकार रोजगार मंत्रालय यांच्या संयुक्त पणे चालवली जाते.

योजनेत सहभाग साठी खालील कागद पत्र लागतात 
१. आधार कार्ड 
२. पॅन कार्ड 
३. बँक पासबुक 
४. वारसाचे नाव 
५. सही 
६. मोबाईल नंबर 





१६ सप्टेंबर, २०२३

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमंतीच्या 50 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख खरेदीसाठी अनुदान दिले जाते

 

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. उर्वरित रक्कम बँकेच्या कर्जाद्वारे दिली जाऊ शकते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी जवळच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (आत्मा) व https://mahadbt.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत  राबविण्यात येते.


महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देणे आणि उत्पादकता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात किंवा अधिक माहितीसाठी त्यांच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/  संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० % ते 1.25 लाखापर्यंत ट्रॅक्टर अनुदान, योजनेत सहभागी होण्यासाठी आजच अर्ज करा. अर्ज करण्यासाठी महा डी बी टी पोर्टल mahadbt https://mahadbt.maharashtra.gov.in/ वरती आपणास नोंदणी करता येईल, अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक महिन्यात  जमा केले जाते. योजनेत निवड झाल्या पासून आपणास एक महिन्याच्या आत वस्तू खरेदी करून त्या वस्तूचे GST बिल, व योजने साठी लागणारे कागद पत्र उपलोड करावे लागतात, त्या त्यानंतर कृषी अधिकारी हे चौकशी अहवाल सदर करता त्या नंतर आपणास एक महिन्याच्या आत आपले अनुदान जमा होईल.

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.

1. योजनेसाठी अर्ज

२. ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड इ.)

3. पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, युटिलिटी बिल इ.)

४. जमिनीच्या मालकीची कागदपत्रे (७/१२ उतारा, विक्री करार इ.)

5. बँक खात्याचा तपशील

6. आपण खरेदी करू इच्छित ट्रॅक्टर मॉडेलसाठी अधिकृत डीलरकडून कोटेशन

7. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेली इतर कागदपत्रे.

 

ई- पिक पाहणी केल्यास मिळणार या योजनेचा फायदा


महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रे व अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत करणे हे उद्दिष्ट आहे

१. उत्पादकता वाढविणे : आधुनिक कृषी यंत्रे व उपकरणांचा वापर केल्यास शेतकऱ्यांची उत्पादकता व उत्पादन वाढण्यास मदत होते.

2. किफायतशीर : या योजनेत शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री आणि उपकरणे खरेदीसाठी आर्थिक मदत

केली जाते, ज्यामुळे त्यांना दीर्घकाळात पैशांची बचत होण्यास मदत होते.

३. वेळेची बचत : आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांचा वापर केल्यास शेतकर्यांचा शेतीच्या विविध कामांमध्ये वेळ व श्रमाची बचत होऊ शकते.

४. सुधारित गुणवत्ता : आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

5. रोजगार निर्मिती : या योजनेमुळे कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, कारण अधिकाधिक शेतकरी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये गुंतवणूक करू शकतील.एकंदरीत महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेमुळे शेतकर्यांना त्यांच्या शेतीपद्धतीत सुधारणा होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.

एक रुपयात पिक विमा- प्रधान मंत्री फसल बिमा योजना (PMFBY) या अंतर्गत योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यासाठी ३१जुलै २०२३ पर्यंत मुदत

लोकप्रिय पोस्ट