१३ जानेवारी, २०२५

RTE Admission 2025-26 Application Form Open/ RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुरुवात येथे अर्ज करा.

सन २०२५-२६ या वर्षांसाठी (RTE) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार 

RTE Admission 2025-26

दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत असून RTE प्रवेश प्रकीये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मुलाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया  दि. १४-०१-२०२५ पासून सुरु होऊन  दि. २७-०१-२०२५ पर्यंत सुरु राहील.

मुलांना शाळामध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर अर्ज भरण्याची सोय केली आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणारे योग्य कागद पत्र जवळ ठेऊन आपल्या मुलांचा अर्ज पूर्ण करावा. अर्ज बिनचूक पूर्ण करावा. अर्ज करताना आपणास ज्या शाळेत मुलाला प्रवेश घेयचा आहे. ती शाळा निवडून अर्ज पूर्ण करावा. अर्जाचा युजर आय डी व पासवर्ड जपून ठेवावा. तसेच अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबर चुकीचा किंवा बंद देऊन नाही . कारण प्रवेश प्रक्रीयासाठी संपर्क साठी त्याच मोबाईल नंबर चा वापर होणार आहे .अर्जाची छाननी झाल्यावर , प्रवेश निवड हि लॉटरी पद्धतीने एकाच टप्यात लिस्ट काढली जाईल. तसेच RTE प्रवेश एवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल . निवड झालेल्या मुलास आपल्या लॉगीन मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाईल, तसेच प्रवेश घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, कागद पत्रे पडताळणी झाल्या नंतर मुलांना प्रवेश दिला जाईल. जर वेळ देऊन हि प्रवेश घेतला नाही. आणि जागा रिक्त राहिली तर वेटिंग लिस्ट मधील मुलांना संधी दिली जाईल.

👉लागणारे कागद पत्र 👇

💞 आधार कार्ड

💞 जातीचा दाखला (लागू असल्यास)

💞 उत्पन्नाचा दाखला

💞 जन्माचा दाखला

💞 रहिवाशी पुरावा

💞 अपंग दाखला (लागू असल्यास)

💞 तसेच इतर कागद पत्र (अनाथ मुले, विधवा , एच. आय. व्ही. बाधित , घटस्फोटीत इ. ) लागू असल्यास 

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

👉 RTE प्रवेश २०२५-२६ यावर्ष साठी संपूर्ण मार्गदर्गक पत्रिका 👈

👉 RTE प्रवेश २०२५-२६ यावर्ष साठी संपूर्ण माहिती / जाहिरात 👈

👉 RTE प्रवेश २०२५-२६ यावर्ष साठी अर्ज करण्यासाठी 👈

लोकप्रिय पोस्ट