मागेल त्याला सैर कृषी पंप / Magel Tyala Saur Krushi Pump Yojana -
योजने चा अर्ज करणे सुरुवात झाले असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आली आहे . शेतकर्यासाठी हि योजना खूप लाभदायक असून यात जास्त जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्सागत सौर कृषी पंप खरेदी साठी सामान्य शेतकर्यांसाठी ९०% अनुदान मिळणार आहे.
तसेच अनुसूचित जाती व जमाती (SC and ST )साठी ९५ % अनुदान मिळणार आहे.
वर्गवारी लाभार्थी हिसा |
अनुसुचित
जमाती
5% |
अनुसुचित
जाती
5% |
सर्वसाधारण 10% |
३
एचपी लाभार्थी हिस्सा |
रु. 11,486/-* |
रु. 11,486/-* |
रु. 22,971/-* |
५ एचपी लाभार्थी हिस्सा |
रु. 16,038/-* |
रु. 16,038/-* |
रु. 32,075/-* |
७.५ एचपी लाभार्थी हिस्सा |
रु. 22,465/-* |
रु. 22,465/-* |
रु. 44,929/ |
महाराष्ट्र राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत मा. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.
सौर कृषी पंप मुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणार असून शेती साठी विना अडथला मोफत वीज मिळणार आहे. शेतकर्यांना पिकास वेळेत पाणी पुरवठा झाल्या मुळे शेतकर्याचे उत्पन्न वाढ होईल, तसेच उत्पन्न खर्च कमी होईल.